चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात ग्रामीण रस्त्यांची संख्या देखील मोठी आहे मात्र गेली अनेक वर्ष मागणी करूनही सदर रस्त्यांची कामे होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण होत होती. राज्यात भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार आल्यानंतर ग्रामीण भागासाठी महत्वाचे असणारे ग्रामविकास खाते हे मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या.
चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील ग्रामस्थांच्या रस्त्यांच्या समस्या ना.महाजन यांच्याकडे मांडल्या असता त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ‘संशोधन आणि विकास या हेड अंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील ४० किलोमीटरच्या १७ रस्त्यांना मंजुरी दिली आहे.
ही आहेत कामांची वैशिष्टे
सदर रस्त्यांचे काम अतिशय दर्जेदार स्वरूपाचे होणार असून गावांतर्गत कॉंक्रीट रस्ते, आवश्यक त्या ठिकाणी छोटे पूल व पाईप मोऱ्या, संरक्षक भिंती आदी कामांचा यात समावेश असणार आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर ५ वर्ष देखभाल दुरुस्ती देखील सबंधित ठेकेदाराकडे असणार आहे.
की
तळोंदा प्रदे ते – पिंपळवाड निकुंभ (४.३० किमी), ब्राम्हणशेवगे ते हिरापूर (५ किमी), पिंपरखेड – शिवापूर रस्ता (१ किमी), पिंपळवाड निकुंभ ते माळशेवगे रस्ता (४ किमी), पिलखोड ते तामसवाडी रस्ता (१.५ किमी), वाकडी ते मुंदखेडा बू. व खु. रस्ता (३.५ किमी), खेर्डे फाटा ते खेर्डे- सोनगाव रस्ता (१.२० किमी), रामा २११- बोढरे रस्ता (२ किमी), हिंगोणे खु. ते तांदूळवाडी रस्ता (२ किमी), न्हावे वडाळा रस्ता ते ढोमणे गाव (१.५ किमी), लोंढे – विसापूर रस्ता (१ किमी), रोकडे फाटा – रोकडे तांडा रस्ता (१ किमी), खडकी बु. – तांबोळे खु. रस्ता (३ किमी), रामा २११- जुनोणे रस्ता (३ किमी), रामा २११ – वडगाव लांबे रस्ता (३ किमी), हातले – हातले तांडा रस्ता (१ किमी), रामा २११ – नवे दसेगांव रस्ता (२ किमी)