मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेडने रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.mazagondock.in वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड ही केंद्र सरकारच्या अखत्यारितील कंपनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून युद्धनौका व पाणबुड्यांची बांधणी करत आहे. कंपनीने वेबसाइटवर घोषित केल्यानुसार, एकूण 150 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
रिक्त पदाचे नाव :
1) ग्रॅज्युएट अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 135 जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी.
संबंधित संसदेच्या कायद्याद्वारे अशी पदवी प्रदान करण्याचा अधिकार असलेल्या संस्थेने दिलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी.
वरील समतुल्य म्हणून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा.
2) डिप्लोमा अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 35 जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात विद्यापीठाने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
आवश्यक वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावी.
SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
परीक्षा फी : या भरतीसाठी फी नाही
पगार किती मिळणार : 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड चाचणी/मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचनेवर जा.