जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरात सध्या नवखे तरुण गुन्हेगारीकडे वळत असताना अनेक गुन्हे दाखल होत आहे, गंभीर घटना पोलीस ठाण्यात दाखल होत आहे, भारतीय कायदे कठोर आहेत तितकेच पळवाटा शोधणारे देखील आहे. यामुळे तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळतो आहे कि काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांना नवख्या गुन्हेगारांमुळे तपासात डोकेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे काहींचे रेकॉर्ड नसल्याने अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जाते मात्र तेच नवखे तरुण पोलीस कर्मचाऱ्यांसोबत असलेले मैत्री पूर्ण संबंध यामुळे पोलीस ठाण्यात प्रभावशाली ठरत आहे.
तक्रारदार त्या नवख्या विरोधात तक्रार देतो मात्र त्याच्या डोळ्या देखत ज्याच्या विरोधात तक्रार नोंदवली जाते तो पोलीस कर्मचाऱ्यांसोबत खेळी-मेळी च्या वातावरणात पोलीस ठाण्यात वावरतो यामुळे पोलीस नेमकं कोणाच्या बाजूने यामुळे तक्रार करणारा संभ्रमात पडून हवालदिल होतो. यामुळे पोलीस ठाण्यात गुन्हेगारच आपली अधिक ओळख असल्याचे प्रदर्शन करीत असतो मात्र पोलिसांनी गुन्हेगारांना गुन्हेगारासारखी वागणूक दिल्यास खाकी अधिक प्रभावशाली ठरणार आहे.
गेल्या वर्षभरात लॉकडाऊन असताना देखील गंभीर गुन्ह्याच्या घटना शहरात घडल्या आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण गुन्हेगार व अल्पवयीन असलेल्यांचा अधिक समावेश आढळून येत आहे. दोन ते चार केस अंगावर घेतल्या नंतर तरुणाई थेट गुन्हेगारीकडे वळत आहे, गुन्हे अंगावर घेतल्यास काहीही होत नाही या उलट पोलिसांशी नेहमी संबंध येतो असा समज तरुणांमध्ये पसरत आहे हाच फायदा घेत काही जण अवैध व्यवसायाकडे देखील वळले आहे. पोलिसात ओळख ज्याची जास्त त्यांची प्रकरणे देखील मॅनेज होतात असा चुकीचा गैरसमज देखील पसरत असल्याने जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठांपुढे आवाहन उभे टाकले आहे.