भुसावळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात झालेल्या घरफोड्यांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यादरम्यान बाजारपेठ पोलिसांनी जामनेर येथील तिघा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहे. या आरोपींनी शहरात तीन घरफोड्यांची कबुली दिली असून त्यातील बहुतांश मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इरफान उर्फ हर्षद शेख रऊफ (वय 24, टिपू सुलतान चौक, जामनेर), फातेर शेख उर्फ गोल्या तुफेल मोहम्मद शेख (वय 18, ईस्लामपूरा, जामनेर) व शेख समीर उर्फ बाल्या शेख जाकीर (वय 21, मदिना नगर, जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांना 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
अटकेतील आरोपींनी गुरनं.19/2023 मध्ये पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चांदीची पैंजण, दोन हजार 425 रुपयांची रोकड, गुरनं.29/2023 मध्ये 5.5 ग्रॅम वजनाची पोतमधील पँडल व सोन्याचे मणी तर गुरनं.32/2023 मधील मुद्देमालाची अद्याप रीकव्हरी बाकी आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचिन चौधरी, अतुल कुमावत, सागर वंजारी, भरत बाविस्कर, जावेद शहा, तुषार पाटील, सचिन पोळ आदींच्या पथकाने केली.