नवी दिल्ली: राजस्थान आणि मध्य प्रदेशात भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड विमानं कोसळले आहेत. मध्यप्रदेशच्या मोरेना येथे एक आणि राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे विमान कोसळ्यानंतर भीषण आग लागली. या अपघातात विमानाचे अनेक तुकडे झाले आहेत. दोन्ही अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरतपूरमध्ये क्रॅश झालेल्या लढाऊ विमानाने आग्रा येथून उड्डाण केले होते. तर मोरेना येथे कोसळलेल्या विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते. भरतपूरचे डीएम आलोक रंजन यांनी सांगितले की भरतपूरजवळ चार्टर्ड विमान कोसळले आहे. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
दोन पायलट गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, मोरेना येथे सुखोई-30 आणि मिराज 2000 विमाने कोसळली आहेत. या अपघातात दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. सुखोई-30 आणि मिराज 2000 विमानाने ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते. इथे कसरत सुरू होती.