जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गिरणा नदीवरील नियोजित सात बलून बंधारे लवकर मार्गी लागावे यासाठी खा. उन्मेष पाटील यांनी निती आयोगाकडे प्रयत्न केले. बलून बंधार्यासाठी त्यांनी मंजुरीही मिळवली. परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचे कामकाज सुरु न झाल्यामुळे खा. उन्मेष पाटील यांची माहिती केवळ कागदोपत्रीच हवेत विरली का ? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. प्रकल्प मार्गी लागावा त्यासाठी भूसंपादनाची गरज नाही यांची तातडीने स्थळ निश्चिती होऊन संबंधित अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात यावा अशी मागणी खा. उन्मेष पाटील यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी आयोगाचे सल्लागार अविनाश मिश्रा यांची भेट घेऊन चर्चा देखील केली होती. मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागला नाही. परंतु खा. पाटील यांनी घोषणा करून याबाबत शेतकरी व लोकांची निराशाच केली असल्याचे समजते. जिल्ह्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना संजीवनी ठरणारा हरितक्रांतीचा हा प्रकल्प जोईल का नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. नवीन सात बलून बंधारे प्रस्तावाला केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली असली तरी या प्रकल्पाची फाईल कुठे धूळ खात पडली आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या बलून बंधाऱ्यामुळे खानदेशात मोठी जल क्रांती होणार. संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम होणार अशी स्वप्ने खा. उन्मेष पाटील यांनी दाखवली होती. मात्र ती पूर्ण होतील की नाही ??
जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीचे पाणी थेट तापी नदीत मिळते धरणापासून तापी पर्यंत नदीच्या वाटेत कोठेही पाणी अडविले जात नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे वाहणाऱ्या गिरणा नदीचे पाणी अडवले जाऊन त्याचा सिंचनासाठी लाभ व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असतांना त्याकडे मात्र खा. पाटील यांचे दुर्लक्ष होत असल्याचेव दिसून येत आहे. शेतकर्यांच्या या नुकसानाला खा. पाटील जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. केवळ जळगावचे विमानतळ सुरु करून सर्व सामान्य जनतेचे पोट भरणार नाही तर शेत्क्र्यान्चाय महत्वाच्या या विषयाकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. शेतकरी राजा खुश तर सर्व खुश होतील. अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.