जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भारतीय जनता पार्टीला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला असा सवाल जिल्हामध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केला आहे.
दरम्यान ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवतांना हा कळवळा कुठे गेला होता. असे सांगून रोहिणी खडसे यांनी आता गळा काढण्यात काही अर्थ नाही, असे ट्विट आज केले आहे. त्यामुळे या विषयावर राष्ट्रवादी व भाजपा चर्चेला उधान आलं आहे. सध्या ओबीसींच्या विषयावर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. या संदर्भात माहिती अशी की, मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकार कडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. ओबीसींच्या आरक्षणाबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याने नुकसान मात्र ओबीसींचे होत आहे.