पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | आज सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. याआधी मागच्याच महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही देशमुखांच्या नागपुरातील घरावर छापा आहे. त्यानंतर याप्रकारणावर विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सर्वांचं लक्ष कोरोनाकडे असायला हवं, चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत, असं वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
“मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करत आहे. चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सर्वांचे लक्ष कोरोनाकडे असायला हवं. कुणी काहीही मागणी केली तरी चौकशी होत नाही. सीबीआय चौकशीसाठी मात्र राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल” असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.