भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | शहराचा अर्धा भाग अंधारात बुडाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान याचा तपास केला असता, औरंगाबादच्या एका पथकाला जळगाव-भुसावळ महामार्गावरील नवीन ROB ( रेल्वे ओव्हर ब्रिज ) मध्ये भूमिगत केबल मध्ये बिघाड झाल्याचे आढळले.
जळगाव लगतच्या खेडी 132KV उपकेंद्रावरून भुसावळ मधील तापीनगर उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या दोन भूमिगत केबल मध्ये बिघाड झाल्यामुळे बुधवारी सकाळी ११.३० वाजेपासून शहराच्या उत्तर भागातून वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये प्रामुख्याने तहसील कार्यालय, न्यायालय, जळगाव रोड, यावल रोड, मामाजी टॉकीज आदींचा समावेश आहे. वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत पूर्ववत सुरु न झाल्याने नागरिकांचे हाल झाले. महावितारणाच्या पथकाने रात्रभर मेहनत घेऊन भुसावळ साठी साकेगाव आणि इतर ठिकाणच्या उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरु करून दिला.