मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | पोलिसांनी बोगस लसीकरण शिबिराचा पर्दाफाश केल्या नंतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात लाखो रुपये जप्त करण्यात आले आहे. या घटनेची संपूर्ण माहिती देतांना मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सांगितले की, मुंबईत बोगस लसीकरण शिबीर आयोजीत केले होते याप्रकरणी आतापर्यंत सात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गुन्ह्यांची व्याप्ती पाहता विशेष SIT स्थापन करण्यात आली आहे. असेही नागरे पाटील यांनी सांगितले आहे.
पहिले शिबीर हिरानंदानी येथे आयोजित केले होते. सर्वांना कोव्हीशिल्ड लस देण्यात आली. संबंधीत लस घेतल्यावर प्रमाणपत्र हाती आल्यानंतर जागा व वेळ हे वेगवेगळे असल्याने रहिवाश्यांना संशय आला. नागरिकांनी दिलेल्या तक्रारी नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आठ आरोपींना अटक करून 12 लाख रुपये जप्त करण्यात आले. मुख्य आरोपींच्या बँकेची खाती गोठवण्यात आली. दरम्यान शिवम हॉस्पिटल मधून हे खरे डोस घेण्यात आले असून रुग्णालयाच्या डॉक्टरवर कारवाई केलेली आहे. 200 जणांचे जबाब नोंदवले आहे. यात गुन्ह्यानंतर ७ गुन्हे नव्याने मुंबईसह ठाण्यातही या टोळीने केले आहे. याबाबत माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. कांदिवली, वर्सोवा, खार, डोंबिवली, बोरीवली, भोईवाडा, बांगुरनगर अश्या विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून समतानगर आणि अन्धेरीतही अशे प्रकार उघडकीस आले आहे. महेंद्र प्रताप सिंग या नऊ शिबिरांचा मुखिया आहे. तर संजय गुप्ता हा सर्व गुन्ह्यात सहआरोप आहे. राजेश पांडे हा कोकिळाबेन रुग्णालयात सेल्स अधिकारी आहे. मोहोम्मद करीम अकबर आली या सर्व गुन्ह्यात आरोपी असून तो मध्यप्रदेशचा राहणारा आहे. अशी माहिती विश्वास नागरे पाटील यांनी दिली.