मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात आज दिवसभर विविध राजकीय चर्चेला उधान आले आहे. त्यात प्रामुख्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या ईडी च्या छाप्याविषयी बोलले जात आहे. याठिकाणी ईडी ने शोधसत्र सुरु केले होते या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी व विरोधकांनी भाष्य केले आहे. अनिल देशमुख ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात म्हटले आहे. की, केंद्रीय यंत्रनेंना आलेल्या नैराश्यातून हि कारवाई सुरु असून, आम्हाला त्याची यत्किंचीतही चिंता वाटत नाही. असे शरद पवार म्हणाले आहे.
नुकत्याच पुण्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालात सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश झाला यावेळी ते बोलत होते.