पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातून वाहत जाणार्या कृष्णापुरी भागातील हिवरा नदीवरील पुलाच्या आणि पांचाळेश्वर या दोन पुलंच्या कामांचा श्रीगणेशा आज करण्यात आला.
शहराला जोडणाऱ्या या दोन्ही पुलांच्या बांधकामामुळे वाहनधारकांनी व सर्व सामान्य जनतेने समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान पालिकेने यापूर्वीच सूचना प्रसिद्ध करून या मार्गावरील रहदारी बंद केली आहे. बांधकाम व्यावसायिक एम एस पी बिल्डकॉन या कंपनीने कामाचे कंत्राट घेतले असून, याकामाच्या माध्यमातून पालिकेत सत्ताधारी शिवसेनेने वचनपूर्ती कडे पूल टाकले आहे. कृष्णापुरी पुलाची चार फुट उंची वाढवली जात असून त्यासाठी पालिका व आ. किशोर पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. शासनाने चार कोटीचा निधी दिला आहे. तर पांचाळेश्वर यातुलनेने मोठा असलेल्या पुलाला बांधकामासाठी सात कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतांना आ. किशोर पाटील म्हणाले पाचोरा व भडगाव शहरात विविध विकासकामे मंजुरीच्या टप्प्यात असून शहरातील रस्त्यांच्या कामासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी डी.पी.आर ला तत्वता मंजुरी मिळाली आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचे आ. किशोर पाटील यांनी सांगितले आहे.