जळगाव : तालुक्यातील तरसोद गावाजवळ सेंट्रींग कामगाराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. हरुण अब्दुल पिंजारी वय ४२ रा. बहाळ ता. चाळीसगाव असे मयत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील बहाळ या गावातील मूळ रहिवासी हरुण पिंजारी हे रोजगारानिमित्ताने त्याचे सासर असलेल्या जळगाव तालुक्यातील सासर असलेल्या आसोदा या गावात इंदिरानगर येथे राहत होता. पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होता. ते सेंट्रींग काम करुन उदरनिर्वाह भागवत होते. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास साईटवर काम करणाऱ्या एका कामगाराची दुचाकी घेतली व मी जावून येतो असे सांगून हरुन पिंजारी हे गेले. त्यानंतर उशीरापर्यंत घरी परतले नाही. याचदरम्यान तरसोद जवळ रेल्वे खंबा क्रमांक ४२५/३०-२३ याठिकाणी एका जणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली.
अकस्मात मृत्यूची नोंद
लोकोपायलट यांनी घटनेची माहिती भादली रेल्वे स्टेशन मास्तर यांना कळविली, त्यांनी ही माहिती तालुका पोलिसात दिली, घटनेची माहिती मिळाल्यावर सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, खिशात असलेल्या आधारकार्डवरुन मयत हे हरुण पिंजारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्या नातेवाईकांनी माहिती कळविण्यात येवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे हे करीत आहेत.