चाळीसगाव : सन्मान कष्टाचा… आनंद उद्याचा..! हे ब्रीदवाक्य घेत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी मोफत मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे.
सदर योजनेचा शुभारंभ १५ एप्रिल रोजी पाटणादेवी रोड, अहिल्यादेवी चौक, चैतन्य तांडा, ओझर येथून करण्यात आला. सदर मध्यान्ह भोजनात गरमागरम भाजी, ३ पोळी, वरण, भात, लोणचे आणि गोड पदार्थ देण्यात येतो. कामगारांना सकस व पौष्टिक आहार मिळावा हा योजनेचा उद्देश असून चाळीसगाव तालुक्यात सुरुवातीला २००० हजार कामगारांना हे मध्यान्ह भोजन पुरविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी या मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण जनसेवा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती
भोजन वाटप वेळी चाळीसगाव येथे भाजपा भटक्या विमुक्त आघाडी शहराध्यक्ष धर्मराज बच्छे, योगेश पाथरवट, उदेसिंग अण्णा पवार, समाधान सोनवणे, दिनेश साबळे, राहुल आगोणे, भुरा आगोणे, पिंटू आगोणे, दीपक आगोणे तर चैतन्य तांडा येथे विकासो चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिताताई राठोड, उपसरपंच आनंद भाऊ राठोड, सेवानिवृत्त अधिकारी जुलाल भाऊ राठोड, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव चव्हाण, किसन चव्हाण, वसंत भाऊ राठोडझ मधुकर भाऊ राठोड, उद्धल पवार आदी उपस्थित होते.