जळगाव : आयुष्यमान भारतच्या माध्यमातून जळगाव शहरात जनसंपर्क उभारण्याचा अश्विन सोनवणे यांचा प्रयत्न आहे. अश्विन सोनवणे हे जळगाव महापालिकेचे माजी महापौर असून भाजपाचे विद्यमान नगरसेवक आहेत.
आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना मोठ्या उपचारांसाठी लागणाऱ्या खर्चास मदत होणार आहे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये नागरिकांना आयुष्यमान भारतच्या कार्डच्या माध्यमातून विविध उपचारांसाठी सवलती राज्य केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत.
शिबिरात मिळतोय गरिबांना लाभ
जळगाव शहरातील मध्यमवर्गीय नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळावा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अश्विन सोनवणे यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील विविध भागांमध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.