जळगाव: मध्य प्रदेशात गेल्या काही महिन्यापूर्वी रुद्राक्ष महोत्सवानिमित देशभर चर्चेत आलेले शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा हे खान्देशात दोन तासांची शिव कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. खान्देशला मधील नंदुरबार येथे शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम २२ रोजी होत आहे. दोन तासांच्या कार्यक्रमात शिवकथेवर ते मार्गदर्शन करणार आहेत. जीटीपी कॉलेज ते बाहेरपुरा या दरम्यान रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजक तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
याच कार्यक्रमात छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण होणार असून, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री यांनाही निमंत्रण दिले असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. नंदुरबार येथील छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा येणार आहेत.
उद्घाटनाचे दिले निमंत्रण
उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व उद्योजक मनोज रघुवंशी यांनी आज सिहोर येथे श्री विठ्ठलेश सेवा समितीचे शिव महापुराण कथाकार पं.पंडित मिश्रा यांची भेट घेतली. उद्घाटनाचे निमंत्रण पंडित मिश्रा यांनी स्वीकारले. यावेळी पंडित मिश्रा यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योजक मनोज रघुवंशी, योगी रघुवंशी,माजी नगरसेवक दीपक दिघे यांचा गमछा देऊन सत्कार केला.