सावदा राजमुद्रा वृत्तसेवा | सध्या ओबीसी आरक्षणाचा विषय संपूर्ण देशात गाजत आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आले. या पार्श्वभूमीवर भविष्यात असाच प्रसंग ओबीसीतील एसबीसी प्रवार्गावर येऊ शकतो, त्यासाठी एसबीसी प्रवर्ग एकत्रित येण्याच्या दृष्टीकोनातून एसबीसी कुटुंब ऍप अंधे मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष समितीचे शशिकांत आमने यांनी केले आहे.
देशातील ओबीसी या प्रवर्ग अंतर्गत विवीध जातींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. स्वतंत्रपूर्व काळात त्यांची जनगणना झाली आहे. त्यानंतर वारंवार मागणी करूनही ओबीसी जातनिहाय जनगणना तयार असूनही जाहीर करण्यास शासन तयार होत नाही. त्यामुळे केवळ राजकीय स्वार्थापोटी ओबीसींचे एसबीसीचे आरक्षण जाणीवपूर्वक धोक्यात आणले जात आहे. हि बाब विशेष मागास प्रवर्गासाठी सुद्धा घटक आहे असेही त्यांनी सांगितले आहे.