रावेर(प्रतिनिधी) : रावेर बाजार समितीत शेतक-यांचे प्रश्न सोडवतील असेच उमेदवार भाजपा तर्फे देण्यात आले असुन मतदारांनी बाजार समितीत घराणेशाहीला थारा देऊ नका त्यांचा पराभव करण्याचे अवाहन भाजपाचे नेते नंदकिशोर महाजन यांनी केले आहे.
कृषी उपन्न बाजार समितीच्या सार्वत्रीक निवडणुक भाजपा-शिवसेना ‘लोकमान्य शेतकरी पॅनल’प्रचार नारळ श्रीक्षेत्र ओंकारेश्वर फोडण्यात आला या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष आ राजुमामा भोळे,खासदार रक्षा खडसे,भाजपा नेते नंदकिशोर महाजन माजी झेडपी अध्यक्षा रंजना पाटील उत्तर महाराष्ट्रा अध्यक्ष सुरेश धनके युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर,माजी तालुकाध्यक्ष सुनिल पाटील,शिवसेना (शिंदे गट) छोटू पाटील,विजय गोटीवाले,अॅड सूर्यकांत देशमुख,भाजपा सरचिटणीस महेश चौधरी,शिवाजीराव पाटील आदी भाजपा शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार उपस्थित होते.
उमेदवारांनी करून दिला परिचय
भाजपा-शिवसेना पुरस्कृत तर्फे ‘लोकमान्य शेतकरी पॅनल’ मधुन प्रल्हाद पाटील,गोपाळ नेमाड़े,गोंडु महाजन,दिलीप पाटील,राहुल महाजन,चेतन पाटील,सजंय महाजन,कल्पना पाटील,सविता पाटील,दुर्गादास पाटील,प्रविण पाचपोहे नितिन भोगे,विजय महाजन,सिकंदर तडवी,सुनिल पाटील रितेश पाटील,लुकमान शेख,वसंत यवले यांनी परिचय करून दिला.
बाजार समिती निवडणूक खासदार रक्षा खडसेंसाठी प्रतिष्ठेची
आगामी लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असतांना रावेर बाजार समितीची निवडणूक खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. या निमित्ताने रक्षा खडसेंची देखिल प्रतिष्ठापणाला लागणार आहे.आधीच त्यांच्या बद्दल जनतेत नाराजीचा सुर असतांना खासदार खडसे रावेर बाजार समितीत भाजपाचे पॅनल विजयी करून सत्ता कशी राखतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.