जळगाव : जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र आहे. तालुक्यातील आसोदा येथे मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकाच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा गावात पोहोचला असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील आसोदा येथे दोन व्यक्तींमध्ये पूर्व वैमनस्यातून वाद होऊन यातील हद्दपार असलेल्या तरुणाने हवेत गोळ्या झाडल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील एक हद्दपार असलेला तरुण गुन्हेगार त्याच्या मित्रांसोबत रात्री आसोदा येथे आला होता. जुन्या वादाच्या कारणावरून असोदा येथील एका तरुणाशि त्याचा वाद झाला. आसोदा येथील हॉटेल आर्याजवळ झालेल्या या वादानंतर गुन्हेगाराने हवेमध्ये बंदुकीने तीन फेरी झाडल्या असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींचा तपास करीत आहे.