सिंधुदुर्ग : बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकावण्याची धमकी देत सिंधुदुर्गच्या वैभववाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकाने 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने सापळा रचून पोलिस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले आहे.
सिंधुदुर्गमध्ये लाचलुचपत पथकाने याविरोधात कारवाई केली. यामध्ये पोलिस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. अधिक चौकशीसाठी तसेच याआधीची काही प्रकरणे तपासण्यासाठी लाचलुचपत विभागाने दोघांच्या घरीही छापा टाकाल. काही मालमत्ता आणि कागदपत्रांची चौकशी सुरु आहे.
20 हजार रुपये घेताना अटक
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदाराला तुझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील आणि हवालदार मारुती साखरे या दोघांनी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील 20 हजार रुपयांचे पहिले टोकन देतानाच लाचलुचपत पथकाने त्यांना रंगेहात पकडले.