जळगाव : खा.संजय राऊत हे देखील जेष्ठ पत्रकार असून पत्रकारिता क्षेत्रातूनच त्यांचा राजकीय उगम झाला पत्रकारिता क्षेत्रातील महत्त्वपूर्ण जाण असलेले जेष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. यासोबतच शिवसेनेचे ते राज्यसभेचे खासदार देखील आहे राज्यातील पत्रकारांचे प्रश्न राज्यसभेत मांडून महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडावी यासाठी आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, राज्यभरात तसेच जळगाव जिल्ह्यात माध्यम प्रतिनिधी तसेच प्रिंट मिडियाच्या प्रतिनिधीवर सातत्याने हल्ले होत आहे. मात्र पत्रकार संरक्षण कायद्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झाली नसल्याने ठोस अशी कारवाई हल्लेखोरांवर होत नाही यामुळे त्यांचे फावत आहे. आपण लोकसभेत पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी. तसेच पत्रकारांच्या पेन्शन योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या वतीने जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. या आचक अटी काही प्रमाणात शिथिल करून ज्येष्ठ पत्रकारांना देखील आपण न्याय द्यावा.
यांची होती उपस्थिती
विशेषतः यामध्ये २५ वर्ष पत्रकारितेची सेवा व वय वर्ष ५० पूर्ण असे नियमात बदल करून लाभार्थी पत्रकारांना पेन्शन योजनेत समाविष्ट कराव्यासह यामागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जळगाव अध्यक्ष कमलेश देवरे, संदीप महाले, काशिनाथ चव्हाण, निखील वाणी यांची उपस्थिती होती.
संजय राऊत यांनी दिले आश्वासन
पत्रकार बांधवांच्या पेन्शन योजनेतील जाचक अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार करणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा विषय प्रलंबित असून पत्रकारांवरती वाढते हल्ले हा देखील प्रमुख मुद्दा आहे. एक पत्रकार म्हणून मी पत्रकारांच्या बाजूने हा विषय सरकार दरबारी मांडणार असल्याचे आश्वासन संजय राऊत यांनी यावेळी दिले आहे.
पेन्शन योजनेतील जाचकअटी शिथिल करा
केंद्र शासन तसेच राज्य शासन दरबारी सातत्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या पेन्शन योजनेत संदर्भातील जाचकअटी शिथिल करण्यासाठी लढा उभारण्यात आला असून पाठपुरावा करण्यात येत आहे, त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या मागण्यांबाबत राज्यसभेत प्रलंबित विषय मांडण्यासाठी संजय राऊत यांना पत्र देऊन विनंती करण्यात आली आहे.
– कमलेश देवरे, अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, जळगाव