रावेर(प्रतिनिधी): मध्य प्रदेश-महाराष्ट्राला जोडणा-या पाल रस्त्यावर वाहन धारकाकडून एक आरटीओ अधिकारी वसूली करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओवर लोकांकडून संतापजनक कॉमेंड येत असुन.यामुळे आरटीओ विभागाची प्रतिमा मलिन होत आहे.
या बाबत वृत्त असे की मध्य प्रदेशातुन -महाराष्ट्रातील रावेर तालुक्यात येण्यासाठी ओव्हरलोड ट्रक चोरवड येथील चेक पोष्ट चुकवण्यासाठी पाल मार्गे येतात वाहन चेकिंग करण्यासाठी आरटीओ अधिकारी आदिवासी पाल भागात उभे राहुन ट्रकची चेकींग करतात परंतु अश्याच एका आरटीओ अधिका-याचा व्हिडिओ प्रंचड व्हायरल होतोय.व्हिडिओ मध्ये पंचविसे घेतल्याचे बोलतात संबधित आरटीओ अधिकारी एमएच ०४ ईपी १९१९ गाडीने पळुन गेल्याचे दिसत आहे.रावेर पाल मार्गे मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रकची वाहतूक होत असल्याची ओरड आहे.