जळगाव : अंजना प्रभाकर सोनवणे यांची प्रभाग समिती क्रमांक तीनच्या सभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे.
त्यांच्याविरुद्ध एमआयएमच्या शेख यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र निवडणुकीदरम्यान शेख यांनी माघार घेतल्यानंतर अंजना सोनवणे या प्रभाग सभापती पदी बिनविरोध निवडून आल्या या आहेत. निवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजपा तसेच शिंदे गटाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र काही प्रमाणात होईल बहुमता अभावी अखेर उमेदवारांनी माघार घेतलेली आहे.
ठाकरे गट निवडणुकीपासून लांब
ठाकरे गट मात्र या सर्व निवडणुकीपासून लांबच राहिला आहे. या निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपा गट एकमेकांच्या विरोधात टाकला गेला होता. दोघांकडून विरुद्ध उमेदवार उभे करण्यात आले होते. मात्र निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले आहे.