मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. शिंदे गटातील १६ आमदारांच्या भवितव्यावर कोणत्याही क्षणी निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात आता विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या सर्व घडामोडीत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. मुख्यमंत्री शिंदे अचानक सुट्टीवर गेले असून, ते नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे या आधीच पर्याय म्हणून भाजप अजित पवारांचा पाठिंबा घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या सर्व चर्चांमुळे शिंदे गटात चलबिचल सुरु झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सुट्टीवर गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
मुख्यमंत्री नेमके आहेत कुठे?
मुख्यमंत्र्यांना नाराज म्हणणा-याचा सत्कार करु. मुख्यमंत्री गावाच्या जत्रेला गेले आहेत असे उदय सामंत म्हमाले. शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील असंही उदय सामंत म्हणाले. नॉट रिचेबल माझ्यापुरतं बस्सं अस म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल का आहेत असा प्रश्न विचारणाऱ्यांना अजित पवार यांनी चांगलेच सुनावले आहे. मुख्यमंत्री सुट्टीवर गेले हे CMO ला विचारा. मला विचारु नका असही अजित अजित पवार म्हणाले.
सरकारला धोका नाही – अब्दुल सत्तार
भाजप आणि अजित पवार यांच्यातील आंख मीचोली हा त्यांच्यातील विषय आहे. सरकारला कोणातही धोका नाही असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री त्यांच्या गावी गेले आहेत त्यांनी सुट्टी घेतलेली नाही. 24 तासांतील 18 ते तास काम करत आहेत. यामुळे ते बदल म्हणून ते गावी गेले आहेत.