रावेर : जिल्हा बँकेचा हीशोब मतदारांनी कृषी बाजार समितीत चुकता केला. शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातुन जनतेने दिलेला कौलचा आम्ही आदर करतो. शेतकरी हीतासाठी पॅनल काम करणार असल्याचे मत पॅनल प्रमुख माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केला यावेळी आमदार शिरीष चौधरी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला
कृषी उपन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला तेरा जागा मिळत कौल मिळाला तर भाजपा पुरुस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनला तीन जागा तर अपक्ष दोन जागांवर विजयी झाले. तर प्रहार जनशक्तीच्या परिर्वतन शेतकरी पॅनला खात सुध्दा उघडले नाही. मतदारांनी सर्वाधिक मते माजी आमदार अरुण पाटील यांचे पुतणे मंदार पाटील यांना मिळाली आहे. जिल्हा बँकेत माजी आमदार अरुण पाटील यांचा झालेला राजकीय गेम बाजार समितीत मतदारांनी जनादेश देऊन व्याजासकट परत केल्याची चर्चा दिवसभर रावेर परिसरात होती.यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी फटाके फोडुन गुलाल उधळला
असे आहेत विजयी उमेदवार
विकासो सोसायटी मतदारसंघात- मंदार मनोहर पाटील (३४४ मते )राजू ठेकेदार (३४२ मते) प्रल्हाद पाटील(३१३मते) डॉ राजेंद्र पाटील(२९३मते) योगिराज पाटील(२८०मते) पंकज पाटील (२९५मते) पितांबर पाटील(२६२ मते), महिला राखीव मतदार संघ- मनिषा सोपान पाटील (४०६ मते) सुनिता दिनेश पाटील (३२४), ओबीसी मतदारसंघ- सचिन रमेश पाटील (३८४ मते), एनटी मतदारसंघ जयेश राजेंद्र कुयटे (३१९ मते), ग्राम पंचायत सर्वसाधारण- गणेश ज्ञानेश्वर महाजन (४०४) योगेश ब्रीजलाल पाटील (२८५), एसटी/एसटी मतदारसंघ – सिकंदर जमशेर तडवी (३५१), ग्राम पंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ पांडुरंग शिवदास पाटील (४१८ ), व्यापारी मतदार संघ- रोहीत अनिल अग्रवाल (४४६) विलास श्रवण चौधरी (३४३), हमाल मापाडी- सैय्यद अजगर सैय्यद टुकडू (१८९)
मंदार पाटलांची सहकार क्षेत्रातुन राजकरणात एंट्री
माजी आमदार अरुण पाटील यांचे पुतणे मंदार पाटील यांची कृषी उपन्न बाजार समितीत सोसायटी मतदार संघात सर्वाधीक मतांनी विजयी होत सहकार क्षेत्रातुन राजकारण एंट्री केली आहे.स्व मनोहर पाटील यांचे ते पुत्र असून त्यांचे रावेरात तालुक्यात मराठा समाजा सहीत सर्व समाजात चांगला प्रभाव होता.मंदार पाटील यांना युवा वर्गात मानणारा चांगला वर्ग आहेत.
सात टेबलांवर झाली मतमोजणी
यशवंत विद्यालयात सात टेबलांवर निवडणूक निरीक्षक तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत निवडणुक निर्णय अधिकारी विजय गवळी,सहायक निवडणुक निर्णय अधिकारी फकीरा तडवी यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाल.यावेळी सचिव गोपाळ महाजन, कमलेश पाटील, संतोष तायडे मतमोजणीच्या प्रक्रियेत सहकार्य केले.