नवी दिल्ली: केंद्र सरकारने 14 मोबाईल मेसेंजर ॲप्स ब्लॉक केले आहेत. हे मेसेंजर ॲप्स दहशतवादी कारवायांमध्ये वापरले जात होते. दहशतवादी हे मोबाईल मेसेंजर अॅप्स वापरत होते. या ॲप्सच्या माध्यमातून दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून संदेश मिळत असत.
वृत्तानुसार, दहशतवादी हे मेसेंजर ॲप्स जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या साथीदारांना संदेश पाठवण्यासाठी वापरत होते. देशातील अनेक तपास यंत्रणांच्या अहवालात याची पुष्टी झाली असून, त्यानंतर सरकारने या ॲप्सवर बंदी घातली आहे. हे ॲप्स काश्मीरमधील दहशतवादी त्यांचे समर्थक आणि ऑन-ग्राउंड वर्कर्स (OGWs) यांच्याशी मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी वापरत होते. सरकारने बंदी घातलेल्या ॲप्समध्ये Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second line, Zangi, Threema यांचा समावेश आहे.
पाकिस्तानातून दहशतवाद्यांना पाठवायचे मॅसेज
या ॲप्सचे डेव्हलपर भारतात नाहीत किंवा हे ॲप्स भारतातून ऑपरेट केले जात नाहीत. हे ॲप विकसित करणाऱ्या कंपन्यांची कार्यालयेही भारतात नाहीत. भारतीय कायद्यानुसार माहिती घेण्यासाठी ॲप्सच्या कंपन्यांशी संपर्क होऊ शकला नाही. हे ॲप्स अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की ते ट्रॅक केले जाऊ शकत नाहीत. याशिवाय या ॲप्सच्या डेव्हलपर्सचा शोध घेणेही अवघड आहे. विविध एजन्सींच्या माध्यमातून गृह मंत्रालयाला असे आढळून आले की हे मोबाइल ॲप्स दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना कारवायांमध्ये मदत करतात. पाकिस्तानात बसलेले दहशतवादी त्यांच्या साथीदारांना या ॲप्सच्या मदतीने भारतात मॅसेज पाठवयाचे.