मुंबई: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. विविध पदांच्या एकूण 428 जागा भरल्या जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा त्यांनी अधिकृत वेबसाइट bel-india.in. ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे आहे.
एकूण रिक्त जागा : 428 पदांसाठी होणार भरती
प्रकल्प अभियंता – I च्या 327 पदे
प्रकल्प अभियंता पदाचा तपशील इलेक्ट्रॉनिक्स – 164 पदे, मेकॅनिकल – 106 पदे, संगणक विज्ञान – 47 पदे इलेक्ट्रिकल – 07 पदे, केमिकल – 01 जागा, एरोस्पेस अभियांत्रिकी – 02 पदे.
प्रशिक्षणार्थी अभियंता – I 101 पदे
प्रशिक्षणार्थी अभियंता पदाचा तपशील इलेक्ट्रॉनिक्स – 100 पदे, एरोस्पेस अभियांत्रिकी – 01 जागा.
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता:
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE, B.Tech, B.Sc (चार वर्षे) पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. किंवा अभियांत्रिकीशी संबंधित इतर कोणताही अभ्यासक्रम केला आहे. यासोबतच उमेदवाराला 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : प्रकल्प अभियंता I पदासाठी वयोमर्यादा 32 वर्षे आणि प्रशिक्षणार्थी अभियंता I या पदासाठी वय मर्यादा 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
निवड कशी होईल: या पदांवरील निवडीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर मुलाखती घेतल्या जातील. निवड झाल्यावर, पगार 40,000 रुपये ते 55,000 रुपये प्रति महिना असतो.