रावेर: रावेर पंचायत समितीच्या वयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी तत्कालीन बीडीओ हबीब तडवी यांच्यासह पंधरा जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.तर आता पर्यंत एक कोटी एक लाख रुपये आरोपीं कडून वसुल करण्यात आले आहे.
महाराष्ट्राभर गाजलेला रावेर पंचायत समितीच्या वयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी तत्कालीन गट विकास अधिकारी हबीब तडवी यांच्यासह पंधरा जणांना अटकपूर्व जामीन आणला आहे. तर आता पर्यंत एक कोटी एक लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. तसेच वयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणात अटकेत असलेले ३३ पैकी ३२ जणांचे देखिल जामीन झाले असुन एक जण अजुन तुरुंगातच असल्याची माहीती तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांनी दिली आहे.