रावेर. ( जयंत भागवत ) । तालुक्यात असलेल्या महसूल, कृषी व पंचायत समितीत तब्ब्ल ९० पदे रिक्त आहे. या रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा भर पडत आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजना नागरिकांचे कामे होण्यास उशीर लागत आहे. शासनाने हि पदे त्वरित भरावे अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
महसूल, कृषी व पंचायत समिती हि कार्यालये सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्वाचे विभाग आहे. परंतु , या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने नागरिकांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात वादळी पावसाच्या तडाख्यात केळी पीकं जमीनदोस्त झाल्याने ७५ कोटीहून अधिक केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी १५ ते २० दिवस कृषी आणि महसूल विभागाला लागले होते. महसूल याने जिल्हाधीकाऱ्यांना कृषिविभाग, कृषी अधीक्षक व पंचायत समितीने जि .प चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना अहवाल संबंधित विभागाने पाठवला आहे.
तालुक्यातील रिक्त पदे याप्रमाणे
नायब तहसीलदार ४ ,अव्वल कारकून ९, मंडलाधिकारी ७, महसूल सहाय्यक १० यात निवासी नायब तहसीलदार यांचे पद रिक्त आहे. तर संगायो नायब तहसीलदार जानेवारी पासून रजेवर असल्याने ३३ पैकी ११ पदे रिक्त आहे.
कृषी विभाग
तालुका कृषी अधिकारी पद तब्बल डिड वर्षांपासून रिक्त असून कृषी अधिकारी ४, पर्यवेक्षक ७, कृषी सहाय्यक ३७, सहाय्यक अधीक्षक १, लिपिक ४, अनुलेखक ५, वाहन चालक १,शिपाई ६ एकूण ६४ पैकी ४१ पदे रिक्त आहे. तर पंचायत समितीत ९८ पैकी ३८ पदे रिक्त आहेत. तरी शासनाने या रिक्तपदांवर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी हि मागणी होत आहे.