मुंबई : मागील काही वर्षांत सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुनही नोकरी मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे त्यामुळे सध्याची तरुण पिढी आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे वळू लागली आहे. आज आम्ही अशाच एका करिअर ऑप्शन बद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. यात शिक्षणाची कुठलीही अट नाही. जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल, कॉम्प्युटर चालवण्याची आवड असेल, तर ग्राफिक डिझायनिंग हे तुमच्यासाठी परफेक्ट करिअर आहे. ग्राफिक डिझायनर बनून तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता.
ग्राफिक डिझायनिंग ही अशी गोष्ट आहे जी आपण कोणत्याही अधिकृत अभ्यासक्रमाशिवाय स्वत: शिकू शकता. याशिवाय ऑनलाइन ते ऑफलाइन प्रमाणपत्र मिळवून सुद्धा हे शिकता येतं. याचा अभ्यासक्रम 3 महिने, 6 महिने असतो. तुम्हाला फक्त तुमचा वेळ आणि पैसे बघायचे आहेत.
या ठिकाणी मिळणार रोजगाराच्या संधी
आजकाल सर्वच कंपन्या, राजकीय पक्ष, सेलिब्रेटी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. प्रत्येकाने लोकप्रिय व्हायला हवे. इंटरनेटच्या दुनियेत आपली पोहोच वाढवायची आहे. यासाठी ते दिवसातून अनेक वेळा अनेक सोशल मीडिया हँडल्सवर पोस्ट करत असतात आणि इथूनच तुम्ही सुरुवात करू शकता. कारण बहुतेक पोस्टसाठी ग्राफिक डिझायनरची गरज असते. नोकरी नको असेल तर फ्रीलान्सचं सुद्धा काम करता येऊ शकतं. काम करताना तुमचे कौशल्य वाढवत राहिल्यास आर्ट डायरेक्टर, ॲनिमेटर, कॉन्सेप्ट आर्टिस्ट, इलस्ट्रेटर आणि UX,यूआय डिझायनर आदी पदांवर चांगल्या पगारात कंपनीत नोकरी मिळू शकते. इथे अनेकदा डिग्रीची मागणीही असते.
या कोर्सद्वारे वाढवा कौशल्य
आपले कौशल्य वाढविण्यासाठी, आपण अॅनिमेशन आणि मल्टीमीडिया डिप्लोमा किंवा तीन वर्षांचा यूजी कोर्स करू शकता. मग मागे वळून पाहावे लागणार नाही. तुम्ही सिनेमा मध्ये काम करू शकता. जाहिरातींचे जग तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. यातल्या काही लोकप्रिय जॉब प्रोफाइल-
ग्राफिक डिझायनर : ग्राफिक डिझायनर पोस्टर्स तयार करणे, जाहिरात आणि पॅकिंग डिझाइन इत्यादी, विविध प्रकारची विपणन सामग्री तयार करण्यासाठी ग्राफिक्सचा वापर होतो. ग्राफिक्सचा वापर करून फोटो, पोस्टर्स आणि बॅनर तयार केले जातात.
इलस्ट्रेटर: ग्राफिक डिझाइन सॉफ्टवेअर म्हणजे इलस्ट्रेटरचा वापर करून व्हिजिटिंग कार्ड, डिझाइन बॅनर, डिझाइन कार्टून कॅरेक्टर्स, वेब पेज लेआऊट इत्यादी डिझाइन करणे.
कलाकृती : कलाकृती म्हणजे पुस्तक किंवा जाहिरातीसारख्या एखाद्या गोष्टीत समाविष्ट करण्यासाठी तयार केलेली चित्रे आणि छायाचित्रे.
ॲनिमेटर: सिनेमा, टीव्हीमध्ये आता आपल्याला अनेकदा ॲनिमेटेड कॅरेक्टर्स दिसतात. जाहिरातींच्या दुनियेतही त्यांचं काम वाढलं आहे. हे ॲनिमेटरचे काम आहे.
कला दिग्दर्शक: प्रकाशन, जाहिरात एजन्सी किंवा निवडीसाठी ग्राफिक आर्ट ची निवड, निर्मिती इ. ची जबाबदारी असणारी व्यक्ती. त्यांना उद्योगात मोठी मागणी आहे.