भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | माजी प्रभारी नगराध्यक्ष यांनी निवडक कार्यकर्त्यांसह राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षा प्रवेशाने भुसावळ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुरळपूर्णा आश्रम शाळा जिल्हा अमरावती येथे ना. बच्चू कडू यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी प्रवेश सोहळा संपन्न झाला. अनिल चौधरी यांना यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबादारी देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी यावलचे माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी, यावलचे नगरसेवक अभिमन्यू चौधरी, भुसावळचे संजय आवटे, गणेश बोरसे,अमोल देशमुख, मनोज करनकाळ, शब्बीर शाह, युनुस खान आदि उपस्थित होते. दरम्यान माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी उत्तर महाराष्ट्रात प्रहर पक्ष वाढवणार असल्याचे सांगितले तसेच आगामी काळात भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत आमचा पक्ष ताकदनिशी उतरणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.