मुंबई: लोकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याचा पर्याय देणारी मोदी सरकारची सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम सुपरहिट ठरत आहे. याद्वारे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगली कमाई होत आहे. SGV योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा पैसा अवघ्या पाच वर्षांत डबल झाला. स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी ही योजना खूप लोकप्रिय आहे. ही योजना सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती, ज्यामध्ये मॅच्युरिटी पीरियड आठ वर्षांचा आहे.
जरी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमचा मॅच्युरिटी पीरियड आठ वर्षांचा असला, तरी पाच वर्षांनी पैसे काढण्याची परवानगी आहे. आता गेल्या पाच वर्षांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, 2017-18 या आर्थिक वर्षात, मे महिन्यात, या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पैसे काढण्यापूर्वीचा कालावधी 12 मे 2023 रोजी पूर्ण झाला आहे. या टप्प्यात, ज्या गुंतवणूकदारांनी सोने खरेदी केले होते, त्यांच्यासाठी प्रति ग्रॅम गोल्ड बाँडची किंमत 2,901 रुपये निश्चित करण्यात आली होती, तर सध्या त्याची किंमत 6,115 रुपये झाली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांची गुंतवणूक दुपटीने वाढली आहे.
पाच वर्षांत 110 टक्के परतावा
या गोल्ड बाँड योजनेंतर्गत पाच वर्षांत मिळालेल्या परताव्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा मिळाला आहे. सरकारची ही योजना गुंतवणूकदारांना चांगलीच पसंत पडली असून नफा पाहता त्यात गुंतवलेली रक्कम काढण्याचे आकडे माफक आहेत. सरकारने आतापर्यंत एकूण 62 वेळा सॉवरेन गोल्ड बॉन्ड जारी केले आहेत आणि त्यापैकी 21 असे आहेत, ज्यांचा पैसे काढण्यापूर्वीचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु पैसे काढण्याऐवजी, गुंतवणूकदार अधिक फायदेशीर करार म्हणून त्यांची गुंतवणूक कायम ठेवण्याचा विचार करत आहेत. सॉवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करण्यासाठी रोख, डिमांड ड्राफ्ट किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. यामध्ये प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी डिजिटल सोने खरेदी करण्याची सुविधा आहे.
स्वस्तात सोने खरेदी करण्याचा पर्याय
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किम, खरेतर, बाजारभावापेक्षा स्वस्त सोने खरेदी करण्याचा एक उत्तम पर्याय आहे, जो सरकार प्रदान करतो. या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गोल्ड बाँड जारी करते. त्याची खरेदी म्युच्युअल फंडासारख्या युनिट्समध्ये केली जाते. रिझर्व्ह बँक वेळोवेळी अटी व शर्तींसह गोल्ड बॉण्ड जारी करत असते. या गोल्ड बॉन्डला सरकारी हमी असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही ते विकण्याचा तुमचा विचार करता तेव्हा तुम्हाला सोनं मिळत नाही, परंतु त्यावेळच्या सोन्याच्या दरानुसार पैसे मिळतात.
एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करणे शक्य
या योजनेअंतर्गत तुम्ही फक्त एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करू शकता. तर, गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किम अंतर्गत जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकतो. हिंदू अविभक्त कुटुंबे आणि ट्रस्टसाठी ही मर्यादा 20 किलो इतकी निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही बँका (स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नामांकित पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त एक्सचेंजेस लिमिटेड यांच्यामार्फत सॉवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकता. या योजनेत गोल्ड बाँड्सवर दिलेला व्याजदर हा बॉण्ड्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी भरलेल्या सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या रकमेवर वार्षिक 2.50 टक्के आहे. व्याजाची रक्कम दर सहा महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या खात्यात पोहोचते.
ऑनलाइन खरेदीवर सवलत
या सरकारी योजनेत तुम्ही केवळ स्वस्तात सोने खरेदी करू शकत नाही, तर इतर सवलतींचाही लाभ मिळवू शकता. वास्तविक, ऑनलाइन पेमेंट करण्यावर 50 रुपये प्रति ग्रॅमची सूटही दिली जाते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या रोख्यांची किंमत पैसे काढण्याच्या तारखेच्या आधीच्या आठवड्यात सोन्याच्या सरासरी किमतीच्या आधारावर ठरवली जाते. याशिवाय, जरी सॉवरेन गोल्ड बॉन्डवर मिळणारे व्याज करपात्र असले तरी, या बाँड्सच्या पूर्ततेमुळे होणाऱ्या भांडवली नफ्यावर कोणताही कर लागू होत नाही. या सगळ्यामुळे ही योजना लोकांमध्ये लोकप्रिय राहिली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये या योजनेत सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली आणि हा आकडा 32 टनांच्या उच्चांकावर पोहोचला. गेल्या आर्थिक वर्षातही 27 टन इतके गोल्ड बॉण्ड्ससा खरेदी करण्यात आले होते.