जळगाव : राज्याचे संकटमोचन ग्रामविकास मंत्री असलेले गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य असून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ” कॅन्सर मुक्त व हृदयविकार मुक्त जळगाव ” हे समाज उपयोगी अभियान नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.
जळगाव शहरातील प्रत्येक नागरिकाची कॅन्सर तसेच हृदयविकाराची मोफत तपासणी व आवश्यक असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांच्या संकल्पनेतून बदलत्या वातावरणाचा परिणाम जळगावकरांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत असून यामध्ये जळगाव शहरात अधिक संख्येत कॅन्सर तसेच हृदयविकार या आजाराचे रुग्ण वाढत असून यासाठी त्वरित उपाय योजना करणे गरजेचे आहे. नागरिकांची हीच समस्या हेरून नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी राज्याचे आरोग्य दूत असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज उपयोगी अभियानाचा मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे. कॅन्सर व हृदयविकाराच्या तपासण्या वर्षभरात पूर्ण केल्या जाणार असून शेवटच्या जळगावकर नागरिकांपर्यंत लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
कार्यक्रमाचे स्थळ
मंत्री महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त मातोश्री वृद्धाश्रम व जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, जलाराम नगर येथील अनाथ आश्रम, बाल निरीक्षण गृह ( रिमांड होम) येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, दिव्यांग व मूकबधिर आश्रमात बेडशीट वाटप, व्यवसायिक दृष्ट्या दिव्यांगांना अर्थसहाय्य, असे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे मित्र परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे.