मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे नियमित कामकाजासह भारतीय जनता पार्टी आक्रमक होण्याची शक्यता असल्याने शिवसेनेने दंड थोपटले आहे. अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित रहा असा व्हीप शिवसेनेच्या आमदारांना जाहीर करण्यात आला आहे.
हे अधिवेशन ५ आणि ६ जुलै ला होत आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज, विधेयके, यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या संपूर्ण आमदारांनी पूर्ण दैव्स उपस्थित राहिले पाहिजे असा पक्षादेश व्हीप शिवसेनेचे प्रतोद आ. सुनील प्रभू यांनी सेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेनेच्या आमदारांना जारी केला आहे.