जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी आज ना. गिरीश महाजन यांना वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्यांनी चक्क शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो वापरला होता. यासोबत त्यांनी शरद पवार यांचा मोदींसोबत तर अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो टाकला होता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.दरम्यान, आजच्या या प्रकाराची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने गंभीर दखल घेतली. दुपारी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एका पत्राच्या माध्यमातून संजय पवार यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.