जळगाव : संकटमोचन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाजप नेते, माजी उपमहापौर, नगरसेवक डॉ अश्विन सोनवणे यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक उपक्रमातून मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातून ” स्नेहाची शिदोरी” जोपासली आहे.
माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही पद्धतीची जाहिरात देऊन अथवा नाहक खर्च करून वाढदिवस साजरा करू नये, याउलट सामाजिक भान ठेवून गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य क्षेत्र असेल अथवा गरजू नागरिकांना मदत कार्य अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याकडून करण्यात आले होते.
विविध ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम
आपल्या नेत्यांनी दिलेल्या सूचनेनुसार माजी उपमहापौर, नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरीब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले आहे. शासनाचे बाल निरीक्षण गृह, मातोश्री वृद्धाश्रम, मूकबधिर विद्यालय अशा विविध ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोबतच दिव्यांग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात आले आहे. जेणेकरून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह खेळणी, साहित्य विक्री ते करू शकतील यासाठी उपमहापौर अश्विन सोनवणे यांनी सामाजिक स्नेहाची शिदोरी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जोपासलेली आहे.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश भोळे,डॉ राधेश्याम चौधरी, नगरसेवक सीमा भोळे, उज्वला बेंडाळे, विशाल त्रिपाठी, सुचिता हाडा, दीपमाला काळे, धीरज सोनवणे, अरविंद देशमुख, नलिनी दर्जी, लता बाविस्कर, राहुल मिस्त्री, भूषण पाटील, आकाश पाटील, भरत कोळी, पिंटू काळे, चित्रलेख मालपाणी आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कॅन्सर व हृदयविकार मुक्त जळगाव
मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेते माजी उपमहापौर,नगरसेवक डॉ अश्विन सोनवणे यांनी कॅन्सर व हृदयविकार मुक्त जळगाव हे अभियान देखील सुरू केलेले आहे. याबाबत लवकरच शहरातील प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या तपासण्या करून योग्य उपचार केले जाणार आहे. जळगाव शहरात बदलत्या वातावरणामुळे गोरगरीब नागरिकांना कॅन्सर अथवा हृदयविकाराचे आजार होण्याची शक्यता आहे, उपाय योजना म्हणून शहरातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.