जळगाव : हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघण करीत तलवार बाळगून शहरात दुचाकीवरून फिरणार्या आरोपीसह त्याच्या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. शनिवारी रात्री सिंधी कॉलनी, कंवर नगर पोलीस चौकी समोर नाकाबंदी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जुनेद उर्फ बवाली युनूस शेख (वय 26, रा.बिलाल चौक, तांबापूरा, जळगाव व रहिम शेख सलीम (28, रा.मास्टर कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, जुनेद शेख हा एक वर्षांसाठी हद्दपार असतानाही शहरात आल्याने त्याच्याविरोधात हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी नाकाबंदी केल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी, कंवर नगर पोलीस चौकीसमोर सवंशयित जुनेद उर्फ बवाली युनूस शेख (26, रा.बिलाल चौक, तांबापूरा, जळगाव व रहिम शेख सलीम (28, रा.मास्टर कॉलनी, जळगाव) हे दोघे दुचाकीवरून जाताना आढळले. संशयिताच्या ताब्यातून तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एमआयडीसीपोलीस निरीक्षकजयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, हवालदार संदीप सपकाळे, अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, ललित नारखेडे, रवींद्र पाटील आदींनी केली.