मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून, सर्वसामान्य नागरिक वाढत्या उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. अशात आजपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात 8 जूनला मोसमी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी वर्तवला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना मशागतीची कामे वेळेत उरकून खरीपाच्या पेरणीसाठी सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
‘या’ तारखा महत्वाच्या
येत्या 22, 23, 24 मे राजी मान्सूनपूर्व पाऊस पडणार असून जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेलाही पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. यंदा महाराष्ट्रात 8 जून रोजी मोसमी पावसाला सुरुवात होणार असून यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे.