मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे. NTPC ने विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार NTPC च्या अधिकृत संकेतस्थळावर (ntpc.co.in) अर्ज करू शकतात.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत संकेतस्थळ ntpc.co.in वर जाऊन किंवा https://www.ntpc.co.in/ या लिंकद्वारे या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे केली जाईल.
या पदांसाठी होणार भरती
एकूण 300 सहाय्यक मॅनेजर (ऑपरेशन/मेंटेनन्स) पदांसाठी ही भरती होणार
120 पदं इलेक्ट्रिकल, 120 पदं मेकॅनिकल आणि 60 पदं इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन शाखेतील उमेदारांसाठी असतील. या भरती प्रक्रियेत नियमानुसार आरक्षण लागू असेल.
शैक्षणिक पात्रता
भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार हा एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशनमधील बीई / बी.टेकची पदवी मिळवलेला असावा. कोणत्या प्रवर्गातील उमेदवाराला पदवीला किती गुण असावेत, याबाबतची माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
परीक्षा शुल्क किती लागणार?
भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करताना 300 रुपये शुल्क भरावं लागेल. तर एसटी, एससी, पीडब्ल्यूबीडी, माजी सैनिक आणि महिलांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अर्ज करताना शुल्क ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीनं भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवार नेट बँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पैसे भरू शकतात.
इतका मिळणार पगार
या भरती प्रक्रियेअंतर्गत नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला 60 हजार ते 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
आवश्यक वयोमर्यादा
भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे.
अर्ज करण्याची मुदत
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2023