जळगाव राजमुद्रा | जळगाव शहरात उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दि. 10 रोजी येत असून त्यांचा दौरा निश्चित झाला असल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सकाळी १०:३० वाजता जळगाव उबाटा पक्षप्रमूख उद्धव ठाकरे जळगावमध्ये येत असून अडीच वाजेपर्यंत जळगाव शहरात असणार आहे. यादरम्यान विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले असून तत्पूर्वी उद्धव ठाकरेंचा हा दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पाहायला मिळत आहे.
पिंप्राळा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र महापुरुषांचे उभारण्यात आलेले पुतळे शासकीय निधीतून झाले आहे. राजशिष्टाचारा नुसार कार्यक्रमाचे आयोजन होत नसल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व जळगांव महापालिकेतील भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जळगाव दाखल होण्यापूर्वीच राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मात्र जळगाव शहराचे महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पिंप्राळातील छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच होईल असा दावा केला आहे.
११:०० वाजता महापालिकेतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात येणार आहे. तसेच १२:१५ वाजता पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे देखील आयोजन जळगाव शहरात मानराज पार्क येथे करण्यात आले आहे. या सभेची देखील जय्यत तयारी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. पोलिसांकडून या सभेला परवानगी देण्यात आल्याचे सांगितले आली आहे. या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे नेमका कोणावर निशाणा साधणार ? याकडे आता लक्ष लागून आहे.