जळगाव | मराठा आरक्षणाचा तिढा मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर अखेर 15 दिवसानंतर मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे. याबाबत मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आपण उपोषण सोडायला तयार आहोत मात्र उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती घराण्याचे सातारा कधीचे वंशज उदयनराजे भोसले आणि कोल्हापूर गादीचे वंशज संभाजी राजे छत्रपती यांनी उपोषण स्थळी यावे असे मनोज जरांगे यांनी मागणी केली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून राज्य शासनाचे एकूण तीन जीआर तयार झाल्यानंतर देखील मनोज जरांगे हे उपोषण सोडण्यास तयार नव्हते मात्र राज्य सरकारच्या अनेक नेत्यांनी विविध प्रकारे विनंती तसेच आरक्षणासंदर्भात आश्वासन दिल्यानंतर अखेर मराठा कार्यकर्ते मनोज जरांदे यांनी मराठा आरक्षणाकरिता सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहामध्ये मराठा आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, यामध्ये एक मत झाल्यानंतर मनोज जणांनी उपोषण मागे घेण्याबाबत वक्तव्य केले होते. मात्र उपोषण मागे घेतलं तरी उपोषण स्टडी आंदोलन सुरूच राहणार असं वक्तव्य देखील जरांगे यांनी केले होते.
मनोज जरांगे यांच्या सरकार पुढे पाच अटी ?
सरकारतर्फे कुठल्याही जीआर आला तरी मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यात यावं यासोबतच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर अद्याप पर्यंत जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यात यावे आंदोलनादरम्यान लाठी चार्ज करणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं तसेच उपोषण सोडवण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी ज्या मान्यवरांची मागणी केलेली आहे त्यांनी त्यानुसार उपस्थित रहावं, सरकारच्या वतीने सर्व लेखी स्वरुपात आश्वासन मिळावे अशा प्रमुख पाहण्यासाठी मनोज जहांगीर यांनी सरकार पुढे ठेवले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना माध्यमांनी केलेल्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी बोलतो, सरकार मराठा आरक्षणावर सकारात्मक आहे. सर्वपक्षीय बैठकीत देखील मराठा आरक्षणावर चर्चा झाली आहे. म्हणून यांची भूमिका समजून घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.