जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी आज राज्याचे माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भेट हजेऊं चर्चा केली. याप्रसंगी माजी आ. गुरुमुख जगवाणी, अभिषेक पाटील, अशोक लाडवंजारी यांच्यासह काही प्रमुख जण उपस्थित होते.
यावेळी खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. पालिकेने हुडको कडून घेतलेल्या ७० कोटीच्या कर्जाबाबत शासनाने पुढाकार घेऊन सहकार्य करावे याविषयावर चर्चा झाली.
हुडको कर्ज विषयानंतर झालेल्या बंदद्वार मध्ये महापौर व विरोधीपक्षनेते यांच्यात काही वेळ गुफ्तगू झाली. याभेटी संदर्भात एकनाथ खडसे यांच्यासोबत विरोधी पक्षनेत्यांशी काय चर्च झाली हे नेमके कारण कळू शकले नाही.