जळगाव राजमुद्रा (पहूर) : अतिशय चुरशीच्या झालेल्या पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक मध्ये अखेर भारतीय जनता पार्टीच्या अंबु तडवी यांनी सरपंच पदावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माजी सरपंचांना दारून पराभव पत्करावा लागला अनेक दिग्गजांचेही या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ग्रामविकामंत्री गिरीष महाजन यांचे शिलेदार असलेले अरविंद देशमुख यांनी कस लावल्याने त्यांची शिष्टाई कामात आली आहे त्यासाठी त्यांना मंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
अतिशय सामान्य परिवारातील उमेदवार असलेल्या अंबु तडवी यांना विजय करण्यासाठी अरविंद देशमुख यांनी कंबर कसली होती. अनेकांचा मनोमिलन करणे मध्ये देशमुख यांना यश आले मात्र काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिल्याने अधिक परिश्रम अरविंद देशमुख यांनी घेतल्याचे पहून येथील प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान पाहायला मिळाले आहे.
सामान्य कार्यकर्त्यांचा झालेला दणदणीत विजय हा चर्चेचा विषय चर्चेचा ठरला आहे. तडवी यांना सरपंच पदावर निवडून आणण्यासाठी अरविंद देशमुख यांनी केलेली युव्हरचना विजयास कारनीभुत ठरलेली आहे.
वार्ड क्रमांक २ चे राजू सर वार्ड क्रमांक ६ मध्ये सलिम मौला यांनी जोरदार खिंड लढवली आहे. सरपंच अबू तडवी यांचे ना. गिरीश भाऊ यांनी अभिनंदन केले आहे.