इंजिनीअरिंग / मेडीकल तसेच सर्व प्रकारचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन
जळगाव राजमुद्रा | दरवर्षाप्रमाणे यंदाही एसडी-सीड म्हणजेच सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजने मार्फत उच्च दिल्या जाणाऱ्या श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती वितरणाचा सोहळा मंगळवार दि. २१ २०२३ रोजी दुपा ४.३० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. गणितातील प्रसिद्ध प्राध्यापक सुपर पर्टीचे जनक, तसेच गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंदाचे तरंग निर्माण करणारे, त्याचे स्वप्न फुलविणारे प मा. आनंदकुमारजी, पटना आणि मा. श्री शांतीलालजी मुश्या अध्यक्ष भारतीय जैन संघटना पुणे के प्रमुख पाहुणे म्हणून उपाधी राहणार आहेत.
कार्यक्रमाप्रसंगी त्यांची मुलाखत प्रसिद्ध निवेदिका, मुलाखतकार तसेच प्रेक्षकांचा सुसंवादिनी हा उस्फुर्त किताब भा असलेल्या सौ. मंगला खाडिलकर या घेणार असून त्याच्या प्रेरणादायी, अद्भुत आणि करिअरला नवीन दिशा देण्याचा जीवन प्रवासाचा पट प्रकट मुलाखतीद्वारे से उलगडणार आहे.डॉ. आनंद कुमारजी पटना
डॉ. आनंद कुमारजी – पटना यांचा थोडक्यात परिचय…
डॉ. आनंद कुमार एकनिष्ठ व समर्पित असे गणित या विषयाचे शिक्षक की जे सुपर घटी या प्रणाली साठी नावाजले आहेत.
डॉ. आनंद कुमार यांचा जन्म एक जानेवारी 1973 रोजी पटना (बिहार) येथे आर्थिक परिस्थितीने साधारण अशा कुटुंबात झाला. त्याचे पडील पोस्ट खात्यात नोकरी करीत होते. आनंद कुमार यांचे शिक्षण पटना येथील हिंदी मिडीयम च्या सरकारी शाळेत झाले. शाळेत असतानाच त्यांच्यामध्ये गणित या विषयाची आवड निर्माण झाली. गणित या विषयातील उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांचे ‘नंबर थिअरी’ मधील शोधनिबंध स्पेक्ट्रम’ या अतिशय नावाजलेल्या गणित मॅगझिनमध्ये प्रकाशित झाले. त्यांना केंब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता परंतु वडिलांचे निधन व साधारण आर्थिक परिस्थिती यामुळे तेथे जाऊ शकले नाही.
1992 साली त्यांनी गणित विषय शिकवायला प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी महिना 300 रुपये भाड्याची एक खोली घेतली तेथेच त्यांनी आपले स्वतःचे “रामानुजन स्कूल ऑफ मॅथमेटिक्स सुरू केले. सदर संस्थेत सुरुवातीला फक्त दोन विद्यार्थी प्रविष्ट झाले, परंतु संस्थेने उच भरारी घेत केवळ तीन वर्षातच प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 500 पर्यंत गेली. दरम्यान ज्या गरीब विद्याथ्र्यांना आय. आय. टी. च्या प्रवेश परीक्षेची तयारी करायची होती, परंतु गरीबी मुळे ते फी भरू शकत नव्हते, असे काही विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आले. गरीबी मुळे काही हुशार य होतकरू विद्यार्थी या परीक्षेपासून व शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांचे आयुष्य गरिबीमुळे उध्यस्त होते. आपण अशा गरीब पण हुशार होतकरू विद्याथ्र्यांसाठी काही तरी ठोस पाऊल उचलल पाहिजे असा निर्धार त्यांनी केला.
रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमेटिक्स मध्ये आर्थिक परिस्थितीने गरीब परंतु आयआयटीसाठी प्रवेश मिळविण्यासाठी जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जात असे. या परीक्षेत टॉप थर्टी मुलांची निवड होत असे. अशा सर्व विद्यार्थ्यांना आनंद कुमार विनामूल्य शिक्षण देत असत, तसेच त्यांची राहण्या खाण्याची सोय सुद्धा ते स्वतः करीत, मुलांच्या राहण्याच्या सोयीचे मॅनेजमेंट करण्याच्या कामात
त्यांचे बंधू प्रणय कुमार त्यांना मदत करीत. त्यांच्या आई जयंती देवी स्वतः मुलांसाठी जेवण बनवत असत. अशा प्रकारे 2002 पासून ‘सुपर थर्टी” प्रणालीचे काम सुरू झाले.
आनंद कुमार यांच्या या थोर कार्याचा सन्मान देशातील व विदेशातील अनेक संस्थांनी केला. काही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना खालील प्रमाणे देण्यात आले आहे.
• 8 नोव्हेंबर 2018 मध्ये दुबई येथील मलबार गोल्ड अँड डायमंड द्वारा “ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड 2018”
• 2018 मध्ये भगवान महावीर फाउंडेशन तर्फे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल “महावीर पुरस्कार”
• २०१९ कॅलिफोर्निया येथील फाउंडेशन फॉर एक्सलन्स (FFE) या संस्थेने “एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड 2019
• 2022 मध्ये गणित रत्न पुरस्कार
2023 मध्ये भारत सरकारने साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदान बद्दल “पद्मश्री देऊन गौरविले आहे.
डॉ. आनंद कुमार यांचे कार्य व चरित्र इतके महान व उल्लेखनीय आहे की त्याची भारतीय फिल्म इंडस्ट्रीने सुद्धा दखल घेतली. त्यांचे कार्य व योगदान सिनेमाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचविले 2019 मध्ये दिग्दर्शक विकास भाई यानी सुपर थर्टी” हा चित्रपट आनंद कुमार यांच्या जीवन व कार्यावर प्रसारित केला. या चित्रपटात आनंदकुमार यांची भूमिका हृतिक रोशन ‘या नावाजलेल्या कलाकाराने उत्कृष्ट साकारली आहे.