चाळीसगाव : तालुका पूर्णपणे गंभीर दुष्काळी झालेला असून भविष्यात मिळणाऱ्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक जमा करणे सुरू आहे. सामायिक खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र करून देणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व दलालाकडून लूट होत होती. त्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांचे विशेष प्रयत्न राहिले आहे.
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत संमतीपत्रासाठी १०० रू. स्टॅम्प ऐवजी संबंधित तलाठी / ग्रामसेवक / कृषी सहाय्यक यांच्याकडे सर्व सामाईक क्षेत्रधारक यांनी उपस्थित राहून स्वाक्षरी केलेले विहित नमुन्यातील संमतीपत्र देखील ग्राह्य धरले जाणार आहे.
तरी सर्व शेतकरी बंधू भगिनींनी याची नोंद घ्यावी तसेच संमतीपत्र साठी कुणालाही एक रुपयाही देऊ नये असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.