जळगाव राजमुद्रा | लोकसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत. मात्र आमचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील इच्छुक आहेत. जळगाव लोकसभेमध्ये सर्वाधिक ताकद ही शिवसेनेची आहे आमदार ,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य , नगरसेवक असे मोठे संख्या बळ आमच्याकडे आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा आम्ही लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र या जागे बाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेणार आहेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील संघटनेबाबत महत्वपूर्ण बदल होतील असे देखील संकेत जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील घेतलेल्या बैठकीबाबत संपूर्ण अहवाल पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला जाणार आहे. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधण्यासाठी तसेच आढावा घेण्यासाठी शिवसेना संपर्कप्रमुख सुनील चौधरी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जिल्ह्यातील संघटनेचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला आहे.
जळगाव लोकसभा शिवसेना कडून वारंवार दावा करण्यात येत आहे. मात्र जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांनी पुन्हा दावा केल्याने भाजपा शिवसेनेमध्ये अंतर्गत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. वर्षानुवर्ष भाजपाचे लोकसभेची जागा असताना शिवसेना संपर्कप्रमुख यांनी केलेला दावा आगामी काळातील राजकीय परिस्थितीत तापवणारा आहे. जळगाव लोकसभेची जागा सोडण्यासाठी आम्ही भाजपासोबत देखील बोलणी करू अशी माहिती सुनील चौधरी यांनी दिली आहे.
भाजप कडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल अनेक तक्रारी देण्यात आल्या तरी हा विषय स्थानिक नेत्यांशी बोलून सोडवण्यात येईल. शिवसेनेचे संघटनात्मक कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याबाबत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना निवडणुकांच्या निमित्ताने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती जळगांव लोकसभा संपर्क प्रमूख सुनील चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.