जळगांव राजमुद्रा ( कमलेश देवरे ) | येत्या दोन महिन्यावर राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी- व घटक पक्षाचा मेळाव्याचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागांवरून महायुतीमध्ये केली जाणारी स्फोटक विधाने चर्चेचा विषय बनणार आहे. शिंदे गटाकडून जळगाव लोकसभेवर राजकीय समतोल जमेची बाजू दाखवून जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेला द्यावी ही वागणे जोर धरत असताना अचानकपणे महायुतीच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जळगाव लोकसभेच्या जातीबाबत महायुतीचे नेते ठरवतील तोच उमेदवार असणार असा घुमजाव करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील मेहरून परिसरातील कृष्णा लॉन्स या ठिकाणी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन 11 वाजता करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे फरमान काढण्यात आले आहे. तशा सूचना महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील देण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमध्ये जागांवरून रस्सीखेच असताना भाजपच्या पारंपारिक मतदारसंघावर घटक पक्षांनी दावा केल्याने भाजप नेमका या मेळाव्यातून आपली भूमिका काय जाहीर करते ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोटनिवडणुकीचा काही काळ अपवाद वगळता पूर्णतः जळगाव व रावेर लोकसभेवर भाजपचाच बोलबाला राहिला आहे. यामध्ये सातत्याने मागणी शिंदे गट – शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
भाजपाची आतापर्यंतची राजकीय रचना बघता शिंदे गट शिवसेनेला जळगाव लोकसभेची जागा घेणे किंवा मिळवणे मुश्किलीचे जाणार आहे. जळगाव जिल्हा लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या सोबत राहिला आहे. यामुळे या शिंदे गट शिवसेनेने केलेला दावा निष्पड ठरण्याची शक्यता आहे. भाजपकडून अंतर्गत तयारीला सुरुवात झाली आहे. यासाठी वरिष्ठ नेतृत्वाच्या मोठ्या प्रमाणावर दौरे देखील जळगाव जिल्ह्यात वाढले आहे. भाजपने देशभरातल्या लोकसभेच्या जागा प्रतिष्ठेच्या केल्या आहे. यात घटक पक्षांना सामावून घेत असताना जागा जर सोडली तर कमळाच्या चिन्हावर घटक पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी करावी लागू शकते अशी माहिती भाजपामधील प्रदेश कार्यालयातील सूत्रांनी दिले आहे.
जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन हे एकमेव नेते भाजपाच्या केंद्रस्थानी आहे. यासोबतच शिंदे गट शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आपली भूमिका जाहीर करतील. मात्र महाशक्ती असलेल्या भाजपकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन सर्वांनाच करावे लागणार ही मात्र राजकीय परिस्थिती आहे.
टीम फडणवीस चा भाग असलेले मंत्री गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. संघ परिवारातून काही नवीन इच्छुकांची नावे काही दिवसात पुढे गेली जाणार अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे. अनेक जण लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार म्हणून अंतर्गत पातळीवर कामाला लागले आहेत. भाजपकडून अनेकांना ‘ तयारीला लागा.. उमेदवारीचा काय ते बघू….” असे आश्वासन देखील देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
जळगाव लोकसभेची जागा बदलण्याची वेळ आलीच तर उमेदवारी नेमकी कोणाला ? हा सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे. यासाठी अनेक जणांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी घेणे पसंत केले आहे. नेत्यांच्या संपर्कात राहून लोकसभेच्या निमित्ताने काहीतरी पदरात पाडून घ्यावे असे अनेक जण प्रयत्न करीत आहे. नेत्यांच्या मर्जीत राहिल्यास ऐन वेळेत संधी मिळेल म्हणून अनेकांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. जळगाव लोकसभा तसेच रावेर लोकसभा उमेदवारीच्या बाबतीत राजकीय वातावरण तापवणाऱ्या आहेत मात्र उमेदवारी कापली जाणार का ? भाजपाची नेमकी भूमिका काय असणार ? अंतर्गत वादाचे भाजपा डॅमेज कसे रोखणार ? शिंदे गट – शिवसेना, राष्ट्रवादी आपलं अस्तित्व टिकणार का ? याबाबत मात्र अनेक जण आपली तर्क शक्ती लढवताना बघायला मिळत आहे.