जळगाव राजमुद्रा | आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमी वर नाशिक परिक्षेत्रात 28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. आयजी बी. जी शेखर यांनी नुकत्याच ह्या बदल्या जाहीर केल्या आहे. निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यांत जोरदार घडामोडी घडत आहे. प्रशासनात देखील पूर्व नियोजन म्हणून महत्वपूर्ण फेरफार करण्यात आले आहे.
यांच्या करण्यात आल्या बदल्या ?
जळगाव जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल माणिकराव हिरे, चाळीसगाव ग्रामीण ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव, रामानंद पोलीस स्टेशन शिल्पा गोपीचंद पाटील यांची जळगाव येथील अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. गृह विभाग जळगाव रामकृष्ण महादू कुंभार यांना अहमदनगर कंट्रोल रूम जळगाव अरुण काशिनाथ धनवडे, पाचोरा राहुल सोमनाथ खताळ, भडगाव राजेंद्र प्रल्हाद पाटील याची बदली नाशिक ग्रामीण ला बदली करण्यात आलेली आहे. तर कांतीलाल काशिनाथ पाटील यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे.
ज्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून पुढील आदेशाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत देण्यात आल्या आहे.