जळगाव राजमुद्रा | भारतीय जनता पार्टी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात मंदिर स्वच्छता अभियान राबवत आहे. धार्मिक तीर्थस्थळे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची स्वच्छता व्हावी तसेच लोकसहभागातून उपक्रम राबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण देशभरातील धार्मिक स्थळांवर स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे.
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नडा यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जळगाव शहरातील मंदिरे व धार्मिक तीर्थस्थळ स्वच्छता अभियानासाठी लोकप्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.
जळगाव मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांची अभियान संयोजक म्हणून तर सहसंयोजक सुनील खडके, राजेंद्र घुगे पाटील, मयूर कापसे यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र महानगर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक उज्वला बेंडाळे यांनी दिले आहे.
या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जगळेकर, जळगाव लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेछ्याचा वर्षाव होत आहे. वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या सूचने नुसार मंदिर स्वच्छता अभियान जळगाव शहरात यशस्वी करणार असल्याच्या प्रतिपादन डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.