संघटना व दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे-आवाहन
जळगांव राजमुद्रा | कोल्हे वाड्यात राहणाऱ्या शितल मराठे यांच्या घराला आग लागून घरातील अन्नधान्य, कपडे सहित घरातील सर्व वस्तू सहित मिळालेली पगार सुद्धा जळून खाक झाल्याचे वृत्त वाचून जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख व उपाध्यक्ष सैयद चांद यांच्यासह मन्यारवाड्यातील कार्यकर्ते अब्दुल रऊफ टेलर, राजू खरादी,अख्तर शेख, वसीम शेख, मुजाहिद खान ,रफिक शेख, ताहेर शेख, जुल्कर नैन, हे स्वतः शीतल मराठे यांच्या घरी जाऊन त्यांची आई लक्ष्मीबाई व मुलगा हेमंत यांना भेटून त्यांच्या दुःखात सहभागी झाले.
७५ वा प्रजास्त्ताक दिनाचे औचित्य व ७५०० रू चे सहकार्य
२६ जानेवारी ७५ वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ७५०० रुपयाची मदत शितल मराठे यांना करण्यात आले तसेच अजून जी काही मदत लागेल ते करण्याचे अभिवचन मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी शितल मराठे यांना दिले.
शितल मराठे यांच्याशी चर्चा करताना कळाले की अद्याप त्यांना शासनाची अथवा लोकप्रतिनिधीची, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यां तर्फे कोणत्याही स्वरूपाची मदत मिळालेली नाही, म्हणून मन्यार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी जळगाव शहरातील दानशूर दाते यांना आवाहन केले आहे. की त्यांनी शीतल मराठे यांना त्वरित सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.